
अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये 2025 वर्षात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पण आता एक मोठा विक्रम या वर्षाच्या शेवटच्या दिवशी नोंदवला गेला आहे. अभिषेक शर्माने आंद्रे रसेलचा स्ट्राईक रेटचा विक्रम मोडीत काढला आहे. (फोटो- PTI)

अभिषेक शर्मा टी20 क्रिकेट इतिहासात एका वर्षात 200च्या स्ट्राईक रेटने एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने वर्षाचा शेवट 200च्या स्ट्राईक रेटने केलेला नाही. ( Photo: Instagram)

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलने 185.34 च्या स्ट्राईक रेटने 1074 धावा केल्या होत्या. 2024 या वर्षात त्याने ही कामगिरी केली होती. त्याने एका वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा 185.34 च्या स्ट्राईक रेटने केल्या होत्या. Photo: Stu Forster/Getty Images)

2025 मध्ये अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये एकूण 1602 धावा केल्या. 202.01 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या स्ट्राईक रेटने 1500हून अधिक धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज ठरला. (फोटो- Pti)

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 190हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 500 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा मानही त्याने मिळवला आहे. या वर्षी अभिषेक शर्माने टीम इंडियासाठी एकूण 859 धावा केल्या आहेत.(Photo: PTI)