
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका बुधवारपासून सुरु होणार आहे. कोलकात्यात होण्याऱ्या पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या प्लेइंग 11 मध्ये तीन आरसीबीचे खेळाडू आहेत.

टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात फिल सॉल्ट इंग्लंडकडून यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणार आहे. फिल सॉल्टला आरसीबीने 11.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्यामुळे फिल सॉल्ट कशी कामगिरी करेल याची आरसीबी चाहत्यांना उत्सुकता आहे.

इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनला आरसीबीने 8.75 कोटी रुपये देत संघात घातलं आहे. लियाम हा अष्टपैलू खेळाडू असून त्याची आतापर्यंतची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. आता भारताविरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आरसीबीने इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेलला 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले. 21 वर्षीय बेथेलही इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. त्यामुळे या युवा खेळाडूची कामगिरी कशी असेल याची उत्सुकता आरसीबीच्या चाहत्यांना लागली आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या टी20 साठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.