बीसीसीआयकडून बांगलादेश क्रिकेटला आणखी एक धक्का, मालिकेबाबत घेतला असा निर्णय

बांगलादेशमधील वाढत्या हिंसाचार आणि परिस्थितीमुळे बीसीसीआयने 2025 नियोजित दौरा रद्द केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पण बीसीसीआयने पुन्हा एकदा बांगलादेशला ठेंगा दाखवला आहे. सुरक्षेचं कारण देत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

| Updated on: Jan 03, 2026 | 8:41 PM
1 / 5
टीम इंडिया 2025 मध्ये बांगलादेशचा दौरा करणार होती. भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार होता. मात्र बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे बीसीसीआयने टीम इंडियाचा दौरा पुढे ढकलला. (Photo: Asian Cricket)

2 / 5
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार क्रिकबझने वृत्त दिले की, टीम इंडिया सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करेल आणि या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी20 मालिका असेल. (Photo: Asian Cricket)

3 / 5
भारताच्या दौऱ्याचं वृत्त आल्यानंतर बीसीसीआयकडून तात्काळ घडामोडी समोर आल्या आहेत. आयपीएलमधून मुस्तफिझुर रहमानची हकालपट्टी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नव्याने आयोजित केल्याचे दौरा पुढे ढकलला आहे.(Photo: Asian Cricket)

4 / 5
बीसीसीआयने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारा बांगलादेश दौरा तात्पुरता पुढे ढकलला आहे, असे इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे. बोर्ड आता या विषयावर भारत सरकारशी चर्चा करेल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईल.(Photo: Asian Cricket)

5 / 5
बीसीसीआयने हा दौरा पुढे ढकलला तर बीसीबीचे मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बांगलादेश बोर्डाला भारत दौऱ्यातून महसूल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु हा दौरा रद्द केल्याने बांगलादेश बोर्डाला प्रायोजकत्व आणि प्रसारण करारांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. (Photo: Asian Cricket)