Asia Cup 2025 : यूएई विरूद्धच्या विजयानंतर टीम इंडिया मालमाल, सूर्यासेनेला बक्षिस म्हणून किती रक्कम?

India vs Uae Asia Cup 2025 : टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात यूनायटेड अरब अमिराती टीमवर मात केली. भारताने या विजयासह ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. भारताला या विजयानंतर बक्षिस म्हणून किती रक्कम मिळाली? जाणून घ्या आकडा.

Updated on: Sep 11, 2025 | 4:51 AM
1 / 5
टीम इंडियाने आशिया कप 2025 मोहिमेतील आपल्या पहिल्याच सामन्यात ठसा उमटवला. भारताने यूएईवर धमाकेदार विजय साकारला. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यूएईवर 9 विकेट्सने विजय मिळवला.  (Photo Credit: Getty Images)

2 / 5
भारतीय गोलंदाजांनी यूएईला पूर्ण 20 ओव्हरही खेळू दिलं नाही. यूएईला 57 धावांवर ऑलआऊट केलं. भारतासाठी कुलदीप यादव याने 4 तर शिवम दुबेने 3 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर भारताने 58 धावांचं आव्हान हे 4.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. (Photo Credit: Getty Images)

3 / 5
टीम इंडियाने या विजयासह 2 पॉइंट्सची कमाई केली. तसेच भारताने 93 बॉलआधी हा विजय मिळवला. त्यामुळे भारताला नेट  रनरेटमध्येही मोठा फायदा झाला. तसेच या विजयानंतर टीम इंडिया मालामाल झालीय. (Photo Credit: Getty Images)

4 / 5
सामन्यानंतर बक्षिस वितरण समारंभात भारतीय संघाच्या वतीने कर्णधार सूर्यकुमार यादव याने 15 हजार डॉलर अर्थात 13.20 लाख रुपयांचा चेक स्वीकारला.एसीसी अर्थात एशियन क्रिकेट काउन्सिलकडून ही बक्षिस रक्कम देण्यात आली. (Photo Credit: Getty Images)

5 / 5
भारतासमोर या धमाकेदार विजयानंतर साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचं आव्हान आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे. भारताला हा सामना जिंकून सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी आहे. (Photo Credit: Getty Images)