
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने रविवारी 2 नोव्हेंबरला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील चौथा सामना हा 6 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला मोठा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (PHOTO CREDIT- PTI)

बुमराहकडे टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. बुमराहला त्यासाठी 7 विकेट्सची गरज आहे. भारतासाठी सर्वाधिक टी 20I विकेट्स घेण्याचा विक्रम हा अर्शदीप सिंह याच्या नावावर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

बुमराहने आतापर्यंत टीम इंडियाचं 78 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. बुमराहने भारतासाठी 98 टी 20I विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अर्शदीप सिंह याने भारतासाठी सर्वाधिक 104 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे बुमराहला अर्शदीपला मागे टाकायचं असेल तर उर्वरित 2 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घ्याव्या लागतील. (PHOTO CREDIT- PTI)

अर्शदीपने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या टी 20I सामन्यात भारतासाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर बुमराहला 1 विकेटही मिळाली नाही. त्यामुळे या दोघांमधील विकेट्सचं अंतर वाढलं. (PHOTO CREDIT- PTI)

तसेच बुमराहकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणखी 1 रेकॉर्ड करण्याची संधी आहे. बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 15 टी 20I डावांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहला आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक टी 20I विकेट्स घेणाला बॉलर होण्याची संधी आहे. बुमराहला त्यासाठी फक्त 1 विकेटची गरज आहे. (PHOTO CREDIT- PTI)