
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20I सामन्यात विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यांनतर आता चौथा सामना हा 6 नोव्हेंबरला होणार आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केलं होतं. मात्र अभिषेकला तिसऱ्या सामन्यात काही खास करता आलं नाही. त्यामुळे अभिषेक शर्मा याच्यावर चौथ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

अभिषेक शर्मा याच्याकडे चौथ्या सामन्यात मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. अभिषेकच्या निशाण्यावर टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली याचा रेकॉर्ड आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

विराटच्या नावावर टीम इंडियाकडून वेगवान 1 हजार टी 20i धावांचा विक्रम आहे. विराटने फक्त 27 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI/Instagram)

अभिषेक शर्मा याने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीतील 26 डावांत 961 धावा केल्या आहेत. त्यामुळे अभिषेकला विराटच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी अवघ्या 39 धावांची गरज आहे. (Photo Credit : PTI/Instagram)

अभिषेक शर्मा याने आतापर्यंत या मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. अभिषेकने 4 सामन्यांमध्ये एकूण 112 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI/Instagram)