
वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 धावांनी सनसनाटी विजय मिळवलाय. ब्रिस्बेनमधील गाबा या ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियानंतर विंडिजने कांगारुंची माज मोडला. अवघी दुसरी कसोटी खेळत असलेल्या शामर जोसेफ हा विंडिजच्या विजयाचा नायक ठरला. शामरने दुखापतीसह खेळत दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेत सामना विंडिजच्या बाजूने फिरवला.

शामर जोसेफ याला बॅटिंग करताना मिचेल स्टार्क याच्या यॉर्कर बॉलवर दुखापत झाली. शामरने या दुखापतीचा बदला ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन घेतला. विशेष बाब म्हणजे विंडिजने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियावर 27 वर्षांनी विजय मिळवला.

शामर जोसेफ याला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुखापत झाली होती. मिचेल मार्श याने टाकलेला यॉर्कर शामरच्या पायाच्या अंगठ्याला लागला.

शामरला झालेल्या दुखापतीमुळे तो खेळेल की नाही, याबाबत शंका होती. मात्र शामरने दुखापतीवर मात करत बॉलिंगसाठी मैदानात उतरला आणि कांगारुंच्या नांग्या ठेचल्या.

शामर जोसेफ याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या डावात 11.5 ओव्हरमध्ये 68 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या. विंडिजने या विजयासह 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली.