
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेमियन मार्टिन याच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गंभीर आजारासह लढा देणाऱ्या या माजी फलंदाजाच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली आहे. माजी क्रिकेटपटू कोमातून बाहेर आला आहे. ऑस्ट्रेलियाच माजी विकेटकीपर एडन गिलख्रिस्ट याने याबाबतची माहिती दिली आहे. (Photo Credit: Getty Images)

डेमियन मार्टिन याची काही दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर डेमियमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर मार्टिनला मेनिनजायटिस हा गंभीर आणि दुर्धर आजार असल्याचं समोर आलं. (Photo Credit:: Getty Images)

मार्टिन या आजारामुळे कोमात गेला. त्यामुळे कुटुंबियांसह चाहत्यांची चिंता वाढली होती. मात्र आठवड्याभरात मार्टिनच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली आहे. मार्टिन कोमातून बाहेर आला. त्यामुळे कुटुंबियांसह चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. (Photo Credit:: Getty Images)

एडम गिलख्रिस्ट याने रविवारी 4 जानेवारीला मार्टिनच्या कुटुंबियांच्या वतीने माजी क्रिकेटरच्या तब्येतीबाबत माहिती दिली. मार्टिन कोमातून बाहेर आल्यानंतर व्यक्त झाल्याचं गिलख्रिस्टने सांगितलं. तसेच मार्टिनच्या तब्येतीतील बदल हा जादूप्रमाणे असल्याचं कुटुंबियांनी म्हंटलं, असं गिलख्रिस्टने माजी क्रिकेटच्या तब्येतीबाबत माहिती देताना सांगितलं. (Photo Credit: Getty Images)

मार्टिन 2003 च्या वनडे वर्ल्ड कप विजयी संघाचा सदस्य होता. मार्टिनने टीम इंडिया विरुद्ध अंतिम सामन्यात 88 धावांची खेळी केली होती. मार्टिनने ऑस्ट्रेलियासाठी 67 कसोटी सामन्यांत 4 हजार 406 धावा केल्या. तसेच मार्टिनने 208 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 हजार 346 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या या फलंदाजाने एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 18 शतकं आणि 60 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit: Getty Images)