
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सराव सामन्यांचा थरार रंगणार आहे. या सराव सामन्यांसाठी दिल्लीच्या 2 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. प्रियांश आर्या आणि आयुष बडोनी या दोघांची इंडिया ए टीममध्ये निवड करण्यात आली आहे. सराव सामन्यांसाठी या दोघांना दिल्ली रणजी संघातून रिलीज करण्यात आलंय. तर आयुष दोसेजा याला दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)

इंडिया ए टीम टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेआधी 2 सराव सामने खेळणार आहे. इंडिया ए समोर 2 फेब्रुवारीला अमेरिकेचं आव्हान असणार आहे. तर इंडिया ए टीम आपला दुसरा सराव सामना हा 6 फेब्रुवारीला नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. आयुष बडोनी आणि प्रियांश आर्या हे दोघे या सराव सामन्यांत खेळणार आहेत. (Photo Credit : PTI)

प्रियांश आर्या याने आतापर्यंत 16 लिस्ट ए सामन्यांमध्ये 34.80 च्या सरासरीने 522 धावा केल्या आहेत. तसेच प्रियांशने 1 शतक आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

आयुष बडोनी याला लिस्ट ए क्रिकेटमध्ये 27 सामने खेळण्याचा अनुभव आहे. आयुषने लिस्ट ए कारकीर्दीत 36.4 च्या सरासरीने 693 धावा केल्या आहेत. आयुषने या दरम्यान 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

तर आता आयुष दोसेजा याला दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आयुषने रणजी ट्रॉफी स्पर्धेत यंदाच्या हंगामात 98.75 च्या सरासरीने 790 धावा केल्या आहेत. तसेच आयुषने या दरम्यान 3 शतकं आणि 5 अर्धशतकं लगावली आहेत. (Photo Credit : PTI)