Bangladesh : भारताशी पंगा घेणाऱ्या बांगलादेशला आयसीसीचा दणका, अशी कारवाई, काय झालं?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचं कारण पुढे भारतात आयोजित टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. आडमुठेपणा करणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने मोठा झटका दिला आहे. मात्र आयसीसीच्या बांगलादेशवरील कारवाईमागील कारण दुसरं आहे. जाणून घ्या.

| Updated on: Apr 22, 2026 | 8:39 PM
1 / 5
बांगलादेश मायदेशात सध्या न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. मात्र बांगलादेशला या विजयानंतर मोठा झटका लागला आहे. आयसीसीने बांगलादेशवर कारवाई केली आहे.(PHOTO CREDIT : PTI)

2 / 5
आयसीसीने बांगलादेशवर स्लो ओव्हर रेटमुळे दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे आयसीसीने बांगलादेशकडून सामन्याच्या एकूण मानधनापैकी 10 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली आहे. बांगलादेशने निर्धारित वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. (PHOTO CREDIT : PTI)

3 / 5
बांगलादेशचा कॅप्टन मेहदी हसन मिराज याने आपल्याकडून झालेली चूक मान्य केली. त्यामुळे अधिकृत कारवाई करण्याची गरज पडली नाही.  (PHOTO CREDIT : PTI)

4 / 5
न्यूझीलंडने या मालिकेत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात 26 धावांनी विजय मिळवला.  त्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. (PHOTO CREDIT : PTI)

5 / 5
दरम्यान उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा गुरुवारी 23 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघात 27 एप्रिलपासून 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. (PHOTO CREDIT : PTI)

Follow Us