
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरचं चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संघात पदार्पण झालं होतं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका पण त्याच्यासाठी अनलकी ठरली. कारण या मालिकेतही त्याला दुखापतीने ग्रासलं. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर एलिस कॅरीचा झेल पकडताना त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. (PC-PTI)

श्रेयस अय्यरच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. त्याला आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. त्याच्या तब्येतीबाबत बीसीसीआयने नवं मेडिकल अपडेट दिलं आहे. तसेच श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर होती याबाबत सांगितलं आहे. (PC-PTI)

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, 25 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरच्या पोटात गंभीर दुखापत झाली. त्याच्या स्प्लीनमधून रक्तस्राव होत होता. सुदैवाने त्याच्या दुखापतीबाबत तात्काळ तपासणी झाली आणि काय झालं ते कळलं. त्यामुळे रक्तस्राव रोखण्यात मदत झाली. (PC-PTI)

बीसीसीआयने पुढे स्पष्ट केलं की, 28 ऑक्टोबरला पुन्हा एकदा स्कॅन करण्यात आलं. तेव्हा सर्वकाही ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. लवकरच बरा होऊन मायदेशी परतेल. (PC-PTI)

बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. तसेच भारतातील डॉक्टरांचा सल्लाही घेतला जात आहे. अय्यरच्या तब्येतील लक्ष असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं. दुसरीकडे, श्रेयस अय्यर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी रजत पाटीदारला संधी मिळण्याची शक्यता आहे. (PC-PTI)