IPL 2026 स्पर्धेदरम्यान बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडवर, नियम मोडणाऱ्या संघाची खैर नाही

आयपीएल स्पर्धेत नियम मोडणाऱ्या संघांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. कारण बीसीसीआय आता कठोर भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. बीसीसीआय सचिवांनी याबाबतची सक्त ताकीद दिली आहे. नियम मोडणाऱ्या संघांविरुद्ध काय करवाई करता येईल याची चाचपणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

| Updated on: May 03, 2026 | 4:07 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेदरम्याने संघांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलं आहे. या घटना पाहून बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आणखी कठोर शिक्षा करण्याचा बीसीसीआयने मानस केला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, या पर्वात नियम मोडणाऱ्या संघांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.  (Photo: PTI)

2 / 5
देवजीत सैकिया यांनी महिला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी संघाची घोषणा केल्यानंतर याबाबत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, जे संघ नियमांचं उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करता येईल. याबाबत आम्ही आता चाचपणी करत आहोत.  आयपीएल नियम आणि प्रोटोकॉलची माहिती घेत आहोत. काही संघ चुकीचं वागत असल्याने त्याच्यांवर कारवाई करू.  (Photo: PTI)

3 / 5
देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, हा फक्त खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा मुद्दा नाही. तर संपूर्ण संघाबाबत आहे. एक टीम म्हणून नियम पाळणं जबाबदारी आहे. अन्यथा आयपीएलच्या छबीला तडा जाईल. यासाठी आम्हाला नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं भाग आहे.  (Photo: PTI)

4 / 5
आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स दोन वेळेस चुकीच्या कारणामुळे चर्चेत आली. एकदा संघ मॅनेजर रविंदर सिंह भिंडरने मोबाईल वापरला. तर दुसऱ्यांदा रियान पराग एका सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूमध्ये वेपिंग पिताना दिसला. भिंडरच्या चुकीसाठी 1 लाखांचा दंड, तर परागच्या सामना फी मधून 25 टक्के कापले आहेत. तसेच परागला एक डिमेरिट पॉइंट दिला आहे.  (Photo: PTI)

5 / 5
भिंडरने बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला स्पष्ट केलं की, मोबाईल वापरण्याची चूक नकळत घडली. दंड ठोठावण्यापूर्वीच त्याने माफी मागितली होती. राजस्थान रॉयल्सचे हेड कोच कुमार संगकारा याने सांगितलं होतं की, फ्रेंचायझीने हे दोन्ही प्रकरणं सोडवली आठहेत. तसेच संघात एक सकारात्मक आणि चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न आहे.  (Photo: PTI)

Follow Us