बीसीसीआय हेडक्वॉर्टरमध्ये नेमकं काय घडतंय? त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गिल-अय्यरला थेट बोलवलं
भारतीय क्रिकेटचं भविष्य, आगामी आयसीसी स्पर्धा आणि संघातील इतर घडामोडींवर बीसीसीआयच्या मुख्यालयात मंथन सुरू आहे. काही समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना बोलवण्यात आलं आहे.

भारतीय संघ नुकताच श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकून मायदेशी परतला आहे. या कसोटी मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला. तर टी20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात झिम्बाब्वेला क्लिन स्विप दिला. पण विजयापूर्वी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाची स्थिती नाजूक होती. या प्रकरणी कर्णधार शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना बोलवणं आलं आहे. (Photo: PTI)
रिपोर्टनुसार, गुरूवारी बीसीसीआयच्या सचिवांसोबत हेड कोच गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांची बैठक आहे. या बैठकीत इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यातील पराभवाची कारणमीमांसा केली जाणार आहे. या बैठकीला वनडे कर्णधार शुबमन गिल आणि टी20 कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही बोलवण्यात आलं आहे. (Photo: PTI)
इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाने वनडे आणि टी20 मालिका गमावली होती. इंग्लंडमध्ये भारताला 4-0 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवूनही 1-2 ने मालिका हातून गेली. इतकंच काय तर आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाला 0-2 क्लिन स्विप मिळाल्याने नाचक्की झाली होती. (Photo: PTI)
बीसीसीआयला खरं तर इंग्लंड दौऱ्यानंतर समीक्षा करायची होती. पण श्रीलंका दौरा असल्याने ही बैठक टाळली होती. आता या बैठकीत श्रीलंकेतील कामगिरीचीही समीक्षा केली जाणार आहे. (Photo: PTI)
मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात सीओईचे हेड व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बोलवण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत टीम इंडियाच्या भविष्याबाबत चर्चा केली जाणार आहे. (Photo: PTI)