IND vs ENG : ध्रुव जुरेलने प्लेइंग 11 मध्ये नसतानाही रचला इतिहास, केलं असं की..

भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे राखीव खेळाडू ध्रुव जुरेलने यष्टीरक्षक भूमिका बजावली. यावेळी त्याने चार जणांना बाद केले. एका कसोटी डावात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय पर्यायी यष्टीरक्षक ठरला आहे.

| Updated on: Jul 26, 2025 | 6:30 PM
1 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना भारताच्या हातून गेला आहे.कारण इंग्लंडने मोठी आघाडी घेतली आहे. या सर्वांमध्ये ध्रुव जुरेलने प्लेइंग 11 मध्ये संधी न मिळाल्यानेही पर्यायी खेळाडू म्हणून विकेटकीपिंग करून इतिहास रचला आहे.

2 / 5
मँचेस्टर कसोटी सामन्यात फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे ध्रुव जुरेल पंतऐवजी यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावली. त्याला फलंदाजी काही मिळणार नाही, पण एका कसोटी डावात सर्वाधिक चार विकेट घेणारा पर्यायी भारतीय खेळाडू आहे. ध्रुवने आतापर्यंत एकूण 4 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

3 / 5
ध्रुव जुरेलने प्रथम वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर हॅरी ब्रूकला यष्टीचीत केले. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर जो रूटला यष्टीचीत केले आणि रूटचा 150 धावांचा शानदार डाव संपुष्टात आणला.

4 / 5
94  धावांवर खेळत असलेला बेन डकेट अंशुल कंबोजच्या चेंडूवर कीपर जुरेलने झेलबाद केला. त्यानंतर बुमराहच्या गोलंदाजीवर जेमी स्मिथचा झेल घेतला. यासह त्याने चार विकेट घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

5 / 5
ध्रुव जुरेलने मागील लॉर्ड्स कसोटीतही पर्यायी विकेटकीपर म्हणून खेळला होता. त्या सामन्यात त्याने विकेटकीपर म्हणून 3 विकेट्स घेतल्या. 2021 मध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केएस भरतने पर्यायी विकेटकीपर म्हणून खेळला आणि 3 विकेट्स घेतल्या होत्या. आता जुरेलने भरतला मागे टाकले आहे.  (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क/ कन्नडवरून )