
भारतीय कसोटी संघाचा फलंदाज करुण नायर याने ओव्हलमधील इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावलं. करुणने या अर्धशतकासह अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. करुणला त्याच्या कारकीर्दीतील दुसर्या अर्धशतकासाठी तब्बल 8 वर्ष 227 दिवसांची वाट पाहावी लागली. करुण व्यतिरिक्त 3 फलंदाजांना त्यांच्या कसोटी कारकीर्दीतील 2 अर्धशतकांमध्ये 10 पेक्षा अधिक वर्ष वाट पाहावी लागली. ते कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credid-PTI)

दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर रॉबिन पीटरसन याला कसोटीत अर्धशतकासाठी करुण नायरपेक्षा अधिक प्रतिक्षा करावी लागली होती. रॉबिनने 9 वर्ष 289 दिवसांनंतर (2003-13) कसोटीत अर्धशतक ठोकलं होतं. (Photo Credit -Getty Images)

पाकिस्तानचा माजी सलामवीर फवाद आलम याच्या 2 कसोटी अर्धशतकात 11 वर्ष आणि 167 दिवसांचा अंतर राहिलं. फवादने 2009 नंतर थेट 2020 साली अर्धशतक ठोकलं. (Photo Credit : Respective Owner)

या यादीत भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेल पहिल्या स्थानी आहे. पार्थिवच्या 2 अर्धशतकांमध्ये 12 वर्ष 43 दिवसांचं (2004-16) अंतर राहिलं. (Photo Credit : PTI)

त्यानंतर आता करुण नायर याने त्याची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. करुणला अर्धशतकासाठी 3 हजार 146 दिवसांची (2016-25) प्रतिक्षा करावी लागली. (Photo Credit : PTI)