Triple Century: बिहारमधून आणखी एक वैभव! महिला क्रिकेटपटूने 63 चौकार षटकारांसह ठोकलं त्रिशतक

बिहारच्या महिला क्रिकेटपटूंने आक्रमक खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षरा गुप्ता या क्रिकेटपटूने वनडे क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकलं. कोणत्या सामन्यात आणि कामगिरी कशी होती? ते सर्व जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 18, 2026 | 10:54 PM
1 / 5
बिहारच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अल्पावधीच संपूर्ण जगात नावलौकिक मिळवला आहे. असं असताना बिहारमध्ये आणखी एक क्रिकेट रत्न सापडलं आहे. अक्षरा गुप्ता या महिला क्रिकेटपटूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमाल केली. तिने बीसीए महिला अंडर 19 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं.  (Photo: Instagram)

2 / 5

डावखुरी फलंदाजी अक्षरा गुप्ताने बीसीए महिला अंडर 19 स्पर्धेतील वनडे सामन्यात 126 चेंडूत नाबाद 306 धावांची खेळी केली. या खेळीत अक्षराने 55 चौकार आणि 8 षटकार मारले. (Photo: Instagram)

3 / 5

अक्षरा गुप्ताने फक्त 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर 34 चेंडू खेळत शतक पूर्ण केलं. त्यानंतर खेळी पुढे नेत 300 धावांचा पल्ला गाठला. महिला क्रिकेट इतिहासात 300 धावांचा पल्ला गाठणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या इरा गुप्ताने 346 धावा केल्या होत्या. (Photo: Instagram)

4 / 5

अक्षरा गुप्ता बिहारचं नाव रोशन करेल असं क्रिकेट जाणकार सांगत आहेत. फक्त 14 वर्षांची असताना या वयातील सर्व स्पर्धा खेळणारी बिहारची पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. ती अंडर 15, अंडर 19 आणि अंडर 23 मध्ये खेळली आहे. (Photo: Instagram)

5 / 5

अक्षरा गुप्ता डावखुरी फलंदाज असून आक्रमक खेळीसाठी ओळखली जाते. अक्षराचा खेळ असाच राहिला तर भारतीय संघात तिला येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत तिला संधी मिळण्याची शक्यता आहे. (Photo: Instagram)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us