
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटूंचा निवृत्तीची मालिका सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात जगातील अनेक महान क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आज दोन विदेशी क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकीर्द थांबवली.

मागच्या वर्षी टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटला रामराम ठोकणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. यापुढे रोहित शर्मा फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसेल.

रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही 12 मे रोजी कसोटी क्रिकेटला निरोप दिला. इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याची निवृत्ती सर्वांनाच धक्का देणारी ठरली. टी20 विश्वचषकानंतर विराटने निवृत्ती घोषित केली होती. त्यामुळे विराट आता फक्त एकदिवसीय सामने खेळेल.

श्रीलंकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने 23 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मॅथ्यूजने श्रीलंकेसाठी 118 कसोटी सामने खेळले. यात त्याने 8167 धावा केल्या. यामध्ये 16 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे.

एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने 2 जून रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता ते फक्त टी20 स्वरूपात खेळेल. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला होता.

2 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे. क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाठी 4 कसोटी, 60 एकदिवसीय आणि 58 टी20 सामने खेळले आहेत. (फोटो- टीव्ही9 नेटवर्क/फाईल))