टीम इंडिया आहे की गुजरात टायटन्स? भारतीय संघात शुबमन गिलच्या आयपीएल संघातून इतके सारे खेळाडू
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून काही जणांना डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, आयपीएलच्या गुजरात टायटन्स संघातील सर्वाधिक खेळाडूंची संघात निवड झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय 1 कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात दोन्ही संघांची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पण कसोटी आणि वनडे संघावर कर्णधार शुबमन गिलची छाप स्पष्टपणे दिसत आहे. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना संघाची घोषणा झाल्याने चर्चा तर होणार.. कारण कोणत्या फ्रेंचायझीमधून कोणत्या खेळाडूला संधी मिळाली याची आकडेवारी बांधली जात आहे. पण दोन्ही संघातील खेळाडूंची आकडेवारी पाहिली तर शुबमन गिल नेतृत्व करत असलेल्या गुजरात टायटन्सची छाप दिसत आहे. (Photo: PTI)

कसोटी संघात 15 खेळाडूंची निवड केली आहे. यात अर्ध्याहून अधिक खेळाडू हे गुजरात टायटन्स संघाकडून खेळतात. गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुबमन गिलसह 7 खेळाडू कसोटी संघात आहेत. शुबमन गिल, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, मानव सुथार आणि गुरनूर ब्रार यांची संघात निवड झाली आहे. (Photo: PTI)

वनडे संघातही कर्णधार शुबमन गिल नेतृत्व करत असलेल्या गुजरात टायटन्स संघाची छाप दिसत आहे. वनडे मालिकेसाठी 14 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यात शुबमन गिल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि गुरनूर ब्रार याला संधी दिली आहे. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सुरू होतील. भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात 6 जूनपासून कसोटी सामना खेळेल. त्यानंतर 14 जून, 17 जून आणि 20 जूनला वनडे मालिकेतील सामने असतील. (Photo: Getty Images)