IND vs AFG : टीम इंडियात वनडे सीरिजसाठी कुणाला संधी-कुणाला डच्चू? जाणून घ्या

India vs Afghanistan Odi Series 2026: बीसीसीआय निवड समितीने मंगळवारी 19 मे रोजी अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेतून काही खेळाडूंचं कमबॅक झालंय. तर काही खेळाडूंची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे.

| Updated on: May 19, 2026 | 7:02 PM
1 / 5
बीसीसीआय निवड समितीने अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याची निवड केलेली नाही. तसेच विकेटकीपर ऋषभ पंत याचा पत्ता कट करण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
भारतीय एकदिवसीय संघात विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याचं कमबॅक झालं आहे. इशानचं 3 वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. इशानने अफगाणिस्तान विरुद्धच अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. (Photo Credit : PTI)

3 / 5
निवड समितीने प्रिंस यादव याला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान दिलंय. प्रिंसने टी 20 क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. तसेच प्रिंसला 14 लिस्ट ए सामने खेळण्याचा अनुभव आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
गुरूनूर ब्रार यालाही पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. गूरनूरने 9 लिस्ट ए सामने खेळले आहेत. तसेच गूरनरला आयपीएल स्पर्धेत फक्त 1 सामना खेळण्याचा अनुभव आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
संजू सॅमसन टीम इंडियासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. मात्र त्यानंतरही निवड समितीने संजूला अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान दिलेलं नाहीय. (Photo Credit : PTI)

Follow Us