IND vs PAK : हार्दिक पांड्या आशिया कपच्या अंतिम फेरीत ठोकणार शतक, फक्त इतकं केलं की झालं…

आशिया कप 2025 स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. फलंदाजीत फार काही केलं नाही. पण गोलंदाजीत योगदान देत आहे. आता अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

| Updated on: Sep 27, 2025 | 9:25 PM
1 / 5
आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. तसं पाहिलं तर हा काही हायव्होल्टेज सामना नाही. भारताची बाजू भक्कम आहे. पण ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. अशा स्थितीत भारताला अंतिम सामन्यात काही चुका टाळणं गरजेचं आहे. खासकरून क्षेत्ररक्षण सुधारलं पाहीजे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याकडे शतक ठोकण्याची नामी संधी आहे. यासाठी त्याला धावा नाही तर विकेट घेण्याची गरज आहे. त्याने अंतिम सामन्यात दोन विकेट घेतल्या तर त्याच्या नावावर टी20 अनोखं शतक नोंदवलं जाईल. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
हार्दिक पंड्याने 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 129 टी20 सामन्यांमध्ये 98 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
हार्दिक पांड्याने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 98 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात 4 षटकात दोन विकेट घेतल्या की शतक पूर्ण होईल. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
हार्दिक टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अर्शदीप सिंगने टी20 क्रिकेटमध्ये 101 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)