
अष्टपैलू हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. कधी गोलंदाजी, तर कधी फलंदाजीत भारताच्या मदतीला उभा राहतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला पहिली विकेट मिळवून देण्यातही यश मिळवलं. इतकंच काय तर एक मोठा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला.

अष्टपैलू हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 200 विकेटचा पल्ला गाठला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुसरी विकेट घेताच त्याच्या नावावर हा विक्रम रचला गेला आहे. सउद शकीलला 62 धावांवर बाद केलं आणि तोच त्याचा 200 वा विकेट ठरला.

हार्दिक पांड्याने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली होती. त्याने वनडेच्या 85 डावात 89 विकेट घेतल्या. तसेच 11 कसोटीत 17 विकेट, तर टी20 102 डावात 94 विकेट घेतल्या.

हार्दिक पांड्याने 216 आंतरराष्ट्रीय सामन्यात जवळपास 30 च्या सरासरीने 200 विकेट घेतल्या आहेत. एकदा त्याने एका डावात 5 विकेट घेण्याचा कारनामाही केला आहे.

इतकंच काय तर आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत टीम इंडियाकडून एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाजही ठरला आहे. पांड्याने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 14 विकेट घेतल्या. शमीने न्यूझीलंडविरुद्ध 12, तर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 विकेट घेतल्या आहेत.