टी 20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा करण्यात आली. यासह न्यूझीलंड टीम टी 20 वर्ल्ड कपमध्ये नव्या अवतारात दिसणार आहे. न्यूझीलंडच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलंय. न्यूझीलंडच्या या जर्सीची एकच चर्चा पाहायला मिळत आहे.
न्यूझीलंडची नवी जर्सी रेट्रो लूकमध्ये आहे. या जर्सीमुळे क्रिकेट चाहत्यांना 1999 साली झालेल्या वर्ल्ड कपची आठवण झाली आहे. न्यूझीलंड 1999 साली अशाच जर्सीसह मैदानात उतरली होती.
न्यूझीलंड टीमने 1999 साली वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडने तेव्हा इलेक्ट्रिक ब्लू रंगाचा वापर केला. तसंच जर्सीवर छातीवरील भागात 5 सिल्वर फर्न छापले.
मात्र न्यूझीलंडने पूर्णपणे जर्सी कॉपी केलेली नाही. न्यूझीलंडची जर्सी सफेद रंगाची आहे, ज्यावर साधारण निळा रंग आहे. तसेच या जर्सीवर छातीवरील भागात न्यूझीलंड असं नाव लिहिलं आहे.
न्यूझीलंड क्रिकेट टीमची ही नवी जर्सी 30 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे यंदा न्यूझीलंड काही चमत्कार करणार का, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.