
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येत आहे. बांगलादेशने पहिले बॅटिंग केली. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलंय. टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध विजय निश्चित समजला जात आहे. टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध तगडा रेकॉर्ड आहे.

टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात वर्ल्ड कपमध्ये एकूण 4 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने यापैकी 3 तर बांगलादेशने 1 सामना जिंकला आहे.

बांगलादेशने 2007 वर्ल्ड कपमध्ये एकमेव विजय मिळवला. मात्र त्या पराभवामुळे टीम इंडियाला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं होतं.

टीम इंडियाने 2019 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवला होता. बांगलादेशचा 315 धावांचा पाठलाग करताना 286 धावांवरच कार्यक्रम आटोपला होता.

तसेच टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तिन्ही संघांना पराभूत केलंय. टीम इंडियाने हे तिन्ही विजय चेसिंग करताना मिळवले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध विजयी चौकार निश्चित समजला जात आहे.