
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी टक्केवारीत फायदा झाला आहे. मात्र टॉप 2 मध्ये येण्याचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. (Photo- BCCI Twitter)

भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने भारताची विजयी टक्केवारी ही 55.56 इतकी झाली आहे. पण अजूनही तिसर्या स्थानावरच समाधान मानवं लागलं आहे. ऑस्ट्रेलिया 100 टक्क्यांसह पहिल्या, तर श्रीलंका 66.67 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. (Photo- BCCI Twitter)

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया मालिका क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न करत आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने हा दुसरा कसोटी सामना जिंकला तर विजयी टक्केवारीत वाढ होईल. भारताची विजयी टक्केवारी दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर 61.90 इतकी होईल. पण श्रीलंकेच्या तुलनेत कमी असल्याने ही तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागेल. भारताचा पुढची कसोटी मालिका श्रीलंकेशी होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

वेस्ट इंडिजने दुसरा कसोटी सामना जिंकला तर भारताच्या विजयी टक्केवारीला फटका बसेल. इतकंच काय तर वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावर येईल. भारताची विजयी टक्केवारी 47.62 इतकी होईल आणि तिसऱ्या स्थानावर राहील. तर वेस्ट इंडिज 20 टक्क्यांसह पाचव्या स्थानी राहील. हा सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 52.38 राहील. तर वेस्ट 6.67 टक्क्यांसह सहाव्या स्थानी राहील. (Photo- BCCI Twitter)