
अभिषेक शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. टी20 आंतरराष्ट्रीय सातवं अर्धशतक आहे की ते 25 पेक्षा कमी चेंडूत पूर्ण केलं. अभिषेक शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 37 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकार मारत 68 धावांची खेळी केली. (Photo- BCCI Twitter)

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य सूर्यकुमार यादव, फिल साल्टने 25 पेक्षा कमी चेंडूत सात वेळा अर्धशतक ठोकलं आहे. आता अभिषेक शर्मा या दोन्ही खेळाडूंसह त्यांच्या पंगतीत बरोबरीने बसला आहे. (Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न सामन्यात त्याच्या डावातील दुसरा षटकार मारला आणि एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला.(Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्माने पाकिस्तानी संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा मोठा विक्रम मोडला आहे. 2021 मध्ये मोहम्मद रिझवानने 42 षटकार मारले होते. आता, अभिषेकने मोहम्मद रिझवानला मागे टाकत 20254 मध्ये 43 षटकार मारले आहेत. (Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्माने 26 टी20 सामन्यात 37.44 च्या सरासरीने 936 धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. आता अभिषेकला 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 64 धावा हव्या आहेत. यात यशस्वी झाला तर सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनेल.(Photo- BCCI Twitter)