
टीम इंडिया गुरुवारी 19 नोव्हेंबरला पुण्यात बांगलादेश विरुद्ध खेळायला उतरणार आहे. टीम इंडिया बांगलादेशला पराभूत करुन सेमी फायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र टीम इंडियासमोर बांगलादेशच्या 5 खेळाडूंचं आव्हान असणार आहे जे सामना एकहाती पालटण्याची क्षमता ठेवतात. ते 5 जण कोण आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

मुस्तफिजुर रहमान | मुस्तफिजुल रहमान वेगवान गोलंदाज आहे. मुस्तफिजुरने टीम इंडिया विरुद्ध 3 वेळा 5 विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना मुस्तफिजुरपासून सावध रहावं लागेल.

शाकिब अल हसन | शाकिब अल हसन हा जगातील नंबर 1 ऑलराउंडर आहे. शाकिबकडे बांगलादेशचं नेतृत्व आहे. शाकिब बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो. त्याला दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शाकिब विरुद्ध टीम इंडियाला जोरदार तयारी करावी लागेल.

नजमुल हुसेन शांतो | नजमुल हुसेन शांतो हा बांगलादेशनसाठी जिथं कमी तिथं आम्ही पॅटर्नमधला बॅट्समन आहे. तो ओपनिंगही करतो आणि मिडल ऑर्डमध्येही खेळण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना शांतोचा लवकरच कार्यक्रम करावा लागेल.

मेहदी हसन मिराज | मेहदी हसन मिराज स्पिन ऑलराउंडर आहे. मेहदीने कमी कालावधीत अनेक कीर्तीमान केले आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांना याचा जपूण सामना करावा लागेल.

लिटॉन दास | लिटॉन दास बांगलादेशसाठी ओपनिंग करतो.लिटॉनने इंग्लंड विरुद्ध 76 धावांची खेळी केली होती. त्यामुळे रोहितसेनेचा लिटॉनला झटपट गुंडाळून बांगलादेशला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न राहिल.