
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील चौथा सामना ड्रॉ करण्यात भारतीय संघाला यश मिळालं. त्यामुळे या मालिकेचा निकाल पाचव्या सामन्यापर्यंत गेला आहे. पण चौथ्या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर परिणाम दिसून आला आहे. (Photo- BCCI)

मँचेस्टर कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर गुणतालिकेत काही फरक झाला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण मिळाले. इंग्लंड तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानावर आहे. दोघांचेही अनुक्रमे 26 आणि 16 गुण आहेत. विजयी टक्केवारी अनुक्रमे 54.17 आणि 33.33 आहे. (Photo- BCCI)

चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडची विजयी टक्केवारी ही 61.11 टक्के होती. पण हा सामना ड्रॉ झाल्याने विजयी टक्केवारी फटका बसला असून 54.16 टक्के झाली आहे. (Photo- BCCI)

भारताच्या विजयी टक्केवारीत फार काही फरक पडला नाही. तिसरा सामना गमावल्यानंतर भारताची विजयी टक्केवारी 50 वरून 33.33 टक्के झाली होती. पण चौथा सामना ड्रॉ झाल्यानंतर यावर काही फरक पडलेला नाही. (Photo- BCCI)

पाचव्या सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेवर फरक पडू शकतो. इंग्लंडने हा सामना जिंकला तर तिसऱ्या स्थानावर राहील. कारण इंग्लंडला दोन गुणांचा फटका बसला आहे. त्यांची विजयी टक्केवारी 63.33 टक्के होईल. हा सामना ड्रॉ झाला तर इंग्लंडला फटका बसेल. विजयी टक्केवारी 50 होईल. तर भारताने हा सामना जिंकला तर तिसऱ्या स्थानावर जाईल. विजयी टक्केवारी 46.67 टक्के होईल. तर इंग्लंडची विजयी टक्केवारी 43.33 टक्के राहील. (Photo- BCCI)

न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 225-2027 मध्ये एकही सामना खेळलेले नाहीत. दक्षिण अफ्रिकेने नुकतंच झिम्बाब्वेला 2-0 ने पराभूत केलं होतं. मात्र झिम्बाब्वे या स्पर्धेचा भाग नाही. म्हणून त्याचे गुण दक्षिण अफ्रिकेला मिळाले नाहीत. (फोटो- South Africa Cricket Twittter)