IND vs ENG WC Final : टीम इंडियाचा कारनामा, फायनलमध्ये स्वत:चाच वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, काय केलं?
U19 World Cup Final 2026 : भारतीय क्रिकेट संघाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐतिहासिक कामगिरी केलीय. भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध महाअंतिम सामन्यात आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढलाय. भारताने 2016 साली काय केलेलं? जाणून घ्या.

ओपनर वैभव सूर्यवंशी याने केलेल्या 175 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर अंडर 19 टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात धमाका केला.भारताने इंग्लंड विरुद्ध विक्रमी 411 धावा केल्या. टीम इंडियाने यासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Bcci X Account)

अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील बाद फेरीच्या इतिहासात इंडिया सर्वोच्च धावसंख्या करणारी पहिलीच टीम ठरली. टीम इंडियाने स्वत:चाच वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाने आजपासून 10 वर्षांआधी 2016 रोजी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत बाद फेरीत सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. भारताने तेव्हा नामिबिया विरुद्ध 6 विकेट्स गमावून 349 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता वैभवच्या खेळीमुळे भारताने 10 वर्षानंतर आपला वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला (Photo Credit : Bcci X Account)

भारताला 400 पार पोहचवण्यात वैभव सूर्यवंशी याने प्रमुख भूमिका बजावली. वैभवने 15 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 80 चेंडूत 175 धावा केल्या. (Photo Credit : Bcci X Account)

तसेच कर्णधार आयुष म्हात्रे याने 53 धावांचं योगदान दिलं. आयुष म्हात्रे याचं हे सलग दुसरं अर्धशतक ठरलं. तसेच कनिष्क चौहान याने नाबाद 37 धावा केल्या. तर अभिज्ञान कुंदु याने 40 धावांचं योगदान दिलं. (Photo Credit : Bcci X Account)