
भारत आणि दक्षिण अफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचं मनोबल वाढलं आहे. असं असताना भारतीय संघाची रांचीच्या मैदानात कशी कामगिरी आहे ते जाणून घेऊयात. (Photo- BCCI Twitter)

शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने वनडे संघाची धुरा केएल राहुलकडे दिली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. पहिला सामना रांचीत होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने रांची मैदानात आतापर्यंत सहा वनडे सामने खेळले आहेत. भारताने पहिला सामना 2013 मध्ये खेळला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. हा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला होता. (Photo- BCCI Twitter)

भारताने आतापर्यंत या मैदानात सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. येथे जिंकलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने लक्ष्यांचा पाठलाग केला आहे. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात या मैदानावर एकमेव वनडे सामना झाला होता. हा सामना 9 ऑक्टोबर 2022 रोजी झाला होता. हा सामना भारताने 7 गडी राकून जिंकला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरने 113 धावांची नाबाद खेळी करत सामना जिंकवून दिला होता. (Photo- BCCI Twitter)