
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेनंतर वनडे मालिकेतही भारताला धोबीपछाड देण्यासाठी उतरणार आहे. तिसरा सामना विशाखापट्टणममध्ये होत आहे. दक्षिण अफ्रिका 10 वर्षानंतर वनडे मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. (Photo- BCCI X)

विशाखापट्टणमच्या मैदानावरील भारताच्या रेकॉर्ड चांगला आहे. भारताने आतापर्यंत या मैदानावर 10 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने सात सामने जिंकले आहेत आणि फक्त दोन सामने गमावले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला. (Photo- BCCI X)

या मैदानावर टीम इंडियाने शेवटचा वनडे विजय 2019 मध्ये मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये या मैदानावर सामना जिंकला होता. आता, सहा वर्षांनंतर, टीम इंडिया या मैदानावर पुन्हा एकदा जिंकण्याचा प्रयत्न करेल. (Photo- BCCI X)

विशेष म्हणजे या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने येथे एकही वनडे सामना खेळलेला नाही. पण दक्षिण आफ्रिकने 2019 मध्ये येथे एक कसोटी सामना आणि 2022 मध्ये एक टी20 सामना खेळला आहे, पण दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे विशाखापट्टणमच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड शून्य आहे. (Photo- BCCI X)

रांची आणि रायपूरप्रमाणे विशाखापट्टणममध्ये दव महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला तर निकाल भारताविरुद्ध जाऊ शकतो. टीम इंडियाला आता नाणेफेकीची चिंता आहे. (Photo- BCCI X Video Screenshot)