
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून कुलदीप यादव याचं टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये तब्बल 11 महिन्यांनंनंतर कमबॅक झालं. उभयसंघातील सलामीचा हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाने विंडीजला पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 162 रन्सवर ऑलआऊट केलं. विंडीजला गुंडाळण्यात सिराजने प्रमुख भूमिका बजावली. सिराजने 4 विकेट्स मिळवल्या. जसप्रीत बुमराहने तिघांना बाद केलं. तर कुलदीपने 2 विकेट्स मिळवल्या. कुलदीपने शाई होप याला फिरकीच्या जाळ्यात फसवत क्लिन बोल्ड केलं. (Photo Credit : PTI)

कुलदीप यादव याने चिवट बॉलिंग केली. कुलदीप टीम इंडियाकडून सर्वोत्तम स्ट्राईक रेटने बॉलिंग करणारा गोलंदाज आहे. कुलदीपचा कसोटीतील बॉलिंग स्ट्राईक रेटन हा 36.7 असा आहे. (Photo Credit : PTI)

कुलदीपनंतर दुसऱ्या स्थानी जसप्रीत बुमराह आहे. बुमराहचा बॉलिंग स्ट्राईक रेट हा 42.4 असा आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या अक्षर पटेलचा बॉलिंग स्ट्राईक रेट हा 43.6 असा आहे. तर चौथ्या स्थानी मोहम्मद सिराज आहे. सिराजचा बॉलिंग स्ट्राईक रेट हा 50.2 इतका आहे. (Photo Credit : PTI)

दरम्यान टीम इंडियाने विंडीजला पहिल्या डावात 162 धावांवर ऑलआऊट केलं. विंडीजला ऑलआऊट करण्यात मोहम्मद सिराज याने प्रमुख भूमिका बजावली. सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत पहिल्या डावात 3 विकेट्स गमावून 67 ओव्हरमध्ये 218 रन्स केल्यात. (Photo Credit : PTI)