
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात सुरु आहे. या सामन्यात शुबमन गिलने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. दुसरीकडे, शुबमन गिल पुन्हा एकदा चाहत्यांमुळे चर्चेत आला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एका मिस्ट्री गर्लने गिलला लव प्रपोजल दिलं. तिच्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (PHOTO CREDIT- PTI)

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार शुबमन गिलने शतक साजरं केलं. यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या तरूणीने एक डेडिकेटेड प्लेकार्ड दाखवलं. ते कॅमेऱ्यात चित्रित झालं. त्यावर 'I Love You Shubman' असं लिहिलं होतं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (PHOTO CREDIT- PTI)

गिलचा एक मोठा चाहता वर्ग आहे. खासकरून मुलींमध्ये त्याची क्रेझ आहे. गिल मैदानात असला की असं चित्र पाहायला मिळतं. फलंदाजी करताना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे चाहते उपस्थित असतात. नुकतंच शुबमन गिलच्या खांद्यावर टेस्टनंतर वनडे संघाची धुरा सोपवली आहे. त्यानंतर त्याच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे. (PHOTO CREDIT- PTI/X)

शुबमन गिलच्या खासगी आयुष्याबाबत अनेक चर्चा होत असतात. याबाबत त्याने स्पष्टीकरण दिलं होतं. हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केलं होतं की, "माझ्याबद्दल इतक्या अफवा उडाल्या आहेत की मला वेगवेगळ्या लोकांशी जोडले जाते. कधीकधी त्या इतक्या विचित्र असतात की मी त्या व्यक्तीला कधीच पाहिले नाही किंवा ओळखतही नाही. तरीही, मला सतत ऐकायला मिळते की मी त्यांच्यासोबत आहे." (PHOTO CREDIT- PTI)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात 196 चेंडूत नाबाद 129 धावा केल्या. यात त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले. शुबमन गिलचं हे दहावं कसोटी शतक आहे. तर कर्णधार म्हणून पाचवं शतक आहे. (PHOTO CREDIT- PTI)