दीप्ती शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मानाचं स्थान

भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माने श्रीलंकेविरुद्ध पाचव्या टी20 सामन्यात एक विकेट घेतली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तिने ऑस्ट्रेलियाचा मेगन शटचा मोठा विक्रम मोडून विश्वविक्रम केला आहे.

| Updated on: Dec 30, 2025 | 10:25 PM
1 / 5
भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत श्रीलंकेला क्लिन स्वीप दिला. पाचही सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. पाचव्या सामन्यात भारताने विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण श्रीलंकेचा संघ 160 धावा करू शकला. हा सामना भारताने 15 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Womens Twitter)

2 / 5
भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. पण यावेळी टी20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात तिने ही कामगिरी केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटला मागे टाकलं आहे. (Photo- BCCI Womens Twitter)

3 / 5
तिसऱ्या टी20 मध्ये 150 टी20 विकेट्स पूर्ण करून तिने इतिहास रचला होता. त्यानंतर चौथ्या टी20 मध्ये तिला कोणतेही यश मिळाले नाही.आता पाचव्या टी20 मध्ये एक विकेट घेत इतिहास रचला आहे. आता टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. (Photo- BCCI Womens Twitter)

4 / 5
दीप्ती शर्माच्या नावावर 152 टी20 विकेट झाल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटच्या नावावर 151 विकेट आहेत. 144 विकेटसह पाकिस्तानची निदा दार तिसऱ्या आणि इंग्लंडची सोफी एक्सलस्टोन 142 विकेटसह चौथ्या स्थानावर आहे.  (Photo- BCCI Womens Twitter)

5 / 5
दीप्ती शर्माने 4 षटकात 28 धावा देत एक गडी बाद केला. दीप्तीने नीलक्षीका सिल्वा हीला पायचीत केलं आणि हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 355 विकेट झुलन गोस्वामीच्या नावावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 335 विकेटसह इंग्लंडची कॅथरिन स्कायव्हर ब्रंट आहे.  तर तिसऱ्या स्थानावर 334 विकेटसह दीप्ती शर्मा आहे. (Photo- BCCI Womens Twitter)