
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा उपकर्णधार शुबमन गिल टी 20I मालिकेसाठी फिट झाला आहे. बीसीसीआयच्या बंगळुरुतील सीओईकडून शुबमन खेळण्यासाठी फिट असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शुबमन टी 20I मालिकेत खेळताना दिसू शकतो.(Photo Credit: PTI)

शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान बॅटिंग करताना मानेला दुखापत झाली होती. शुबमनला त्यामुळे उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं होतं. तसचे शुबमनला एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं. शुबमनने दुखापतीनंतर रिहॅब पूर्ण केलं आहे. आता शुबमन कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Photo Credit: PTI)

शुबमनची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी फिटनेसच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. शुबमनने त्यानंतर रिहॅब संदर्भात सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे. (Photo Credit: PTI)

सीओईकडून शुबमन गिल याने रिहॅब पूर्ण केल्याचं बीसीसीआय टीम मॅनजेंटला पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे. शुबमन क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी फिट असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. (Photo Credit: PTI)

शुबमनला या मानेच्या दुखापतीमुळे 3 एकदिवसीय, 1 कसोटी आणि 1 अर्धवट सामन्याला (कोलकाता कसोटी) मुकावं लागलं. आता शुबमन टी 20i सीरिजमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo Credit: PTI)