आशिया कपसाठी टीम इंडियाचे टॉप 5 फलंदाज निश्चित! कोण ते जाणून घ्या

आशिया कप स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात टीम इंडिया जाहीर केली जाईल. या संघात कोण असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा असल्याने युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

| Updated on: Aug 12, 2025 | 10:43 PM
1 / 6
आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आशिया कप स्पर्धेत कोणते खेळाडू असतील याबाबत चर्चा रंगली आहे. शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या संघात असतील की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. शुबमन गिलला संधी मिळू शकते. पण यशस्वीबाबत अजून तरी काहीच स्पष्ट नाही.

2 / 6
डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा टॉप 5 फलंदाजामध्ये असू शकतो. त्याची निवड निश्चित असून सलामीला उतरेल. तसेच संजू सॅमसनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आशिया कपमध्ये संजू सॅमसन-अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

3 / 6
युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर दिसू शकतो. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली  होती. तिलक वर्मा आशिया कपमध्येही या स्थानावर मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

4 / 6
सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून दिसणार हे निश्चित आहे. गेल्या काही महिन्यांपासून मैदानाबाहेर असलेला सूर्यकुमार आता पूर्णपणे फिट झाला आहे. फलंदाजीचा सराव देखील सुरू केला आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करेल हे निश्चित आहे.

5 / 6
हार्दिक पंड्याचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून पंड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे निश्चित आहे. टीम इंडिया आशिया कपमध्ये मजबूत फलंदाजांसह प्लेइंग इलेव्हन तयार करेल, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

6 / 6
शुबमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचं झालं तर   तर सलामीवीर फलंदाज बदलावे लागतील. त्यामुळे संजू सॅमसनला मधल्या फळीत खेळवावे लागेल आणि गिलला सलामीवीर म्हणून संधी द्यावी लागेल. त्यामुळे आता आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन कशी असेल याची उत्सुकता आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)