IND vs ENG: वादाच्या चर्चा रंगल्या असातना गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र, लंडनमध्ये नेमकं काय घडलं?
Gautam Gambhir- Virat Kohli: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. पण आता समोर आलेल्या फोटोमुळे वेगळंच चित्र दिसत आहे. त्यामुळे या अफवांच्या बाजारात नवा ट्विस्ट आला आहे.

इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा वनडे सामने होण्यापूर्वी टीम इंडियाचा लंडनमध्ये सन्मान करण्यात आला. टीम इंडिया लंडनमधील भारतीय दूतावासात पोहोचल्यावर हा प्रसंग घडला. लंडनमधील भारतीय राजदूत कुमारन पेरियासामी यांनी भारतीय संघाचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला. (Photo: Instagram)

तिसऱ्या वनडे सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाने भारतीय दूतावासाला भेट दिली. या भेटीदरम्यान एक अनपेक्षित आणि गेल्या काही दिवसात उठलेल्या अफवांच्या बाजाराला पूर्णविराम देणारी घटना घडली. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात संवाद झाला. दोघंही मनसोक्त हसताना दिसले. (Photo: Instagram)

इंग्लंडमधील मालिकेदरम्यान गंभीर आणि विराट यांच्यात बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण विराट आणि गंभीर भारतीय दूतावासात मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसले. रोहित आणि गिलसुद्धा त्यांच्यासोबत बसले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसात उठलेल्या वावड्यांना काहीच अर्थ नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (Photo: Instagram)

भारतीय दूतावासात भारतीय संघाच्या खेळाडूंसोबत एक ग्रुप फोटो काढण्यात आला. भारतीय संघाने युकेमधील भारतीय राजदूत कुमारन पेरियासामी यांच्यासोबत हा फोटो काढला. या फोटोत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लाही दिसले. (Photo: Instagram)

भारतीय संघाच्या खेळाडूंनी भारतीय दूतावासात प्रश्नोत्तराच्या सत्रात भाग घेतला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना लॉर्ड्सवर होत आहे. या भारताची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. जर भारताने बाजी मारली तर, शुबमन गिलच्या नेतृत्वात देशाबाहेरील पहिला वनडे मालिका विजय असेल. (Photo: Instagram)