IND vs ENG : दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा पराभव, पण डावखुऱ्या फलंदाजांनी रचला इतिहास

भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी20 सामना गमवला. इंग्लंडने भारताला 4 विकेट आणि सहा चेंडू राखून पराभूत केलं. यासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. असं असलं तरी भारताच्या डावखुऱ्या फलंदाजांनी या सामन्यात विश्वविक्रम रचला.

| Updated on: Jul 05, 2026 | 11:15 PM
1 / 5
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात डावखुरा प्रयोग केला. या सामन्यात भारताने डावखुऱ्या फलंदाजांची फौज उतरवली होती. भारताचा पराभव झाला पण या डावखुऱ्या फलंदाजांनी एक विश्वविक्रम रचला. (Photo: BCCI)

2 / 5
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात एकूण सहा डावखुरे फलंदाज होते. म्हणजेच टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या सात फलंदाजांपैकी सहा फलंदाज हे डावखुरे होते. त्यामुळे हा एक विश्वविक्रम ठरला आहे. (Photo: BCCI)

3 / 5
भारताकडून वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे डावखुरे फलंदाज होते. तर श्रेयस अय्यर हा सात जणांमध्ये एकच उजव्या हाताचा फलंदाज होता. सहा डावखुऱ्या फलंदाजांनी फलंदाजी करून विक्रम रचला. (Photo: BCCI)

4 / 5
वेस्ट इंडिज संघाने एका टी20 सामन्यात पाच डावखुरे फलंदाज उतरवले होते. यापूर्वी टी20 क्रिकेटमधील हा विश्वविक्रम होता. तेव्हा ख्रिस गेल, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, एव्हिन लुईस आणि डॅरेन ब्राव्हो खेळले होते. आता भारताने हा विक्रम मोडला आहे. (Photo: BCCI)

5 / 5
टीम इंडियाने सहा डावखुऱ्या फलंदाजांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  विश्वविक्रम रचला आहे. यासह टी20 क्रिकेट इतिहासात पहिल्या 7 फलंदाजांपैकी सहा डावखुरे फलंदाज संघात स्थान देणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. (Photo: BCCI)

Follow Us