
भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 4-1 ने जिंकला. मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता. त्यामुळे टीम इंडियावर कमबॅकचं मोठं आव्हान होतं. पण टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि पुढील चारही सामने जिंकले.

दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने कमबॅक केलं. विशाखापट्टणम येथील दुसरा सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांननी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव 64 धावांनी जिंकला.

पहिला सामना गमवल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. यापू्र्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने केली आहे. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाला असं यश मिळालं आहे.

ऑस्ट्रेलिायने 1897/97 आणि 1901/1902 या कालावधीत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकले होते. तर इंग्लंडने अशी कामगिरी एकादाच केली आहे. 1911/12 मध्ये कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.

भारताने पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 जिंकली. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. आता 2024 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका 4-1 जिंकली.