
आयपीएल 2024 स्पर्धेतील 38वा मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स विजयासमोर विजयासाठी धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात मुंबईची स्थिती एकदम नाजूक होती. मात्र तिलक वर्माने मधल्या फळीत मोर्चा सांभाळला आणि मुंबई इंडियन्सला धावांपर्यत मजल मारता आली.

आयपीएल स्पर्धेत तिलक वर्माने 38 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यावेळी त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तिलक वर्माचं आयपीएलमधलं हे पाचवं अर्धशतक आहे.

तिलक वर्माने युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत अर्धशतक ठोकलं.टी20 करिअरमध्ये तिलक वर्माचं हे 15 वं अर्धशतक आहे. तसेच त्याने एक शतकही ठोकलं आहे.

तिलक वर्माने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात संदीप शर्माच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना झेल बाद झाला.तिलक वर्माने नेहल वढेरासोबत 99 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमवून 179 धावा करता आल्या.

तिलक वर्मा हा आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा तिसरा तरुण फलंदाज ठरला आहे. ऋषभ पंतने 20 वर्षे 218 दिवसात, यशस्वी जयस्वालने 21 वर्षे 130 दिवस, तिलक वर्मा 21 वर्षे 166 दिवसं, पृथ्वी शॉ 21 वर्षे 169 दिवस आणि संजू सॅमसनने 21 वर्षे आणि 183 दिवसांचा असताना 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.