
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे आणि प्लेऑफचं गणित कठीण झालं आहे.

चेन्नई सुपर किंग्स अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. कारण चेन्नईचे अजूनही 8 सामने शिल्लक आहेत. जर चेन्नईने 16 गुण मिळवले तर प्लेऑफमधील प्रवेश निश्चित असेल. पण यासाठी चेन्नई सुपर किंग्सला पुढील 8 पैकी 7 सामने जिंकावे लागणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्सने पुढील आठपैकी तीन सामने गमावले तर प्लेऑफचा मार्ग कठीण होईल. कारण पाच सामने जिंकले तर सीएसकेचे एकूण गुण 12 होतील. या प्रकरणात दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल. इतकंच काय तर नेट रनरेटची गणना देखील विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्सला थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर पुढील 8 पैकी 7 सामने जिंकावे लागतील. सहा सामने जिंकले तर 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. पण टॉप-4 मधील संघाचे 14 गुण असतील, तरच हे गणित जुळून येईल.

टॉप 4 मधील चार संघांना 16 गुण मिळाले आणि चेन्नई सुपर किंग्सला 14 गुण मिळाले तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील. म्हणूनच चेन्नई सुपर किंग्ससाठी पुढील 8 सामने खूप महत्त्वाचे आहेत. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)