
आयपीएल 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी दिलेल्या 227 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने सावध पण आक्रमक खेळी केली. विराटने या खेळीसह एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. नऊ हजार धावा करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 24 धावा करताच त्याने हे लक्ष्य गाठलं आहे. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

विराट कोहलीने 9000 धावा 280 सामन्यात पूर्ण केल्या. यात चॅम्पियन्स टी20 लीगचाही समावेश आहे. 39.6 च्या सरासरीने त्याने हे लक्ष्य गाठलं आहे. विराट कोहलीने हा पल्ला गाठताना 8 शतकं आणि 64 अर्धशतकं ठोकली आहेत. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

विराट कोहलीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात 30 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. यावेळी त्याने 180 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

विराट कोहलीने या पर्वात 500 हून अधिक धावा केल्या आहे. तसेच आरसीबीने प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. विराट कोहलीने या पर्वात 7 अर्धशतकं ठोकली आहेत. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)