
अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात दुसरा क्वॉलिफायर सामना होत आहे. या सामन्यात माजी कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्मावर लक्ष होते. मात्र या सामन्यात यापूर्वी झालं तसंच काहीसं झालं. (छायाचित्र: पीटीआय)

रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 7 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्याने या सामन्यात एक चौकार मारला. पण स्टोयनिसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना चुकला आणि विजयकुमार विशाकने झेल पकडला. (छायाचित्र: पीटीआय)

रोहित शर्माने पुन्हा एकदा क्वॉलिफायर फेरीत फेल गेला. आतापर्यंतचा त्याचा इतिहास पाहिलं तर तसंच काहीसं म्हणता येईल. रोहित शर्माची क्वॉलिफायर फेरीत कामगिरी निराशाजनक राहिली आहे. (छायाचित्र: पीटीआय)

'हिटमॅन' रोहित शर्माने आतापर्यंत क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 मध्ये एकूण 10 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. पण यामध्येही 90 धावांचा आकडा गाठू शकला नाही. रोहितने 10 च्या सरासरीने फक्त 89 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट फक्त 92 च्या आसपास आहे. रोहित शर्मा एकदाही 30 धावांची खेळी खेळू शकलेला नाही. (छायाचित्र: पीटीआय)

या संपूर्ण हंगामात रोहितची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. काही सामन्यात रोहितने काही दमदार खेळी खेळल्या. या हंगामात आतापर्यंत त्याच्या बॅटने 15 डावांमध्ये 32 च्या सरासरीने 418 धावा केल्या आहेत, यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. (छायाचित्र: पीटीआय)