
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 64व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 2 गडी गमवून 235 धावा केल्या आणि विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं आहे. यात मिचेल मार्शने 117 तर निकोलस पूरनने नाबाद 56 धावांची खेळी केली.

मिचेल मार्शने 56 चेंडूत शतक पूर्ण केलं. आयपीएल स्पर्धेतील त्याचं पहिलं शतक आहे. या खेळीत मिचेल मार्शने 6 षटकार आणि 10 चौकार मारले. मिचेल मार्शने त्याचं अर्धशतक 33 चेंडूत केलं होतं.

मिचेल मार्शने 64 चेंडूत 117 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 8 षटकार आणि 10 चौकार मारले. या पर्वात शतक ठोकणारा पहिला विदेशी फलंदाज ठरला आहे.

लखनौ सुपर जायंट्ससाठी शतकी खेळी करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी लखनौसाठी 2022 मध्ये केएल राहुलने दोनदा शतकी खेळी केली होती. याच वर्षी क्विंटन डी कॉकने नाबाद 140 धावा केल्या होत्या. तर मार्कस स्टोइनिसने 2024 मध्ये नाबाद 124 धावांची खेळी केली होती.

दुसरीकडे, निकोलस पूरनने 27 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकार मारत नाबाद 56 धावांची खेळी केली आहे. या पर्वात निकोलस पूरनचं हे पाचवं अर्धशतक आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)