
आयपीएल 2025 स्पर्धेत 54 सामने पार पडले आहेत. मात्र अजूनही प्लेऑफचं चित्र काही स्पष्ट होताना दिसत नाही. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. मात्र अजूनही उर्वरित 8 संघातून प्लेऑफचं चित्र स्पष्ट झालेलं नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून 3 सामने खेळायचे आहेत. जर त्यांनी यापैकी एक सामना जिंकला तर 18 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

पंजाब किंग्स: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. जर त्यांनी उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकले तर ते 19 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. जर त्यांनी उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकले तर ते 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.

गुजरात टायटन्स: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. 18 गुणांसह पुढील टप्प्यात पोहोचण्यासाठी गुजरात टायटन्सला उर्वरित चार पैकी 2 सामने जिंकावे लागतील.

दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने 10 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे, जर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पुढील 4 पैकी 3 सामने जिंकले तर 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल.

कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर त्यांनी उर्वरित 3 सामने जिंकले तर ते 17 गुणांसह टॉप 4 मध्ये स्थान मिळवू शकतात.

लखनौ सुपरजायंट्स: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्स संघाने खेळलेल्या 11 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर त्यांनी उर्वरित 3 पैकी 3 सामने जिंकले तर 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते.

सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. जर हैदराबादने उर्वरित चार सामने जिंकले आणि 14 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर राहू शकते. पण हे सर्व इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. तर नेट रन रेटच्या आधारे प्लेऑफमध्ये प्रवेश करता येईल. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)