
विराट कोहलीने जेकॉब बेथेलसोबत पहिल्या विकेटसाटी 97 धावांची भागीदारी आहे.यावेळी विराट कोहलीने 33 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार मारले आणि 62 धावा केल्या. सॅम कुरनच्या गोलंदाजडीवर खलील अहमदने त्याचा झेल पकडला आणि आऊट झाला. पण विराट कोहलीने पर्पल कॅपचा मान मिळवला आहे.

विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी सलग दोनदा चारवेळा अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी 2016 मध्ये चार सलग अर्धशतकं झळकावलेली. त्यानंतर 2025 मध्ये ही किमया साधली आहे.

विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक अर्धशतकं ठोकली आहेत. यापूर्वी शिखर धवन, डेविड वॉर्नर आणि रोहित यांच्यासह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. या सर्वांना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 9 अर्धशतकं झळकावली आहेत. पण आता विराट कोहली पुढे निघून गेला असून त्याच्या नावावर 10 अर्धशतकं आहेत.

विराट कोहलीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. इतकंच एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही अव्वलं आहे. त्याने सीएसकेविरुद्ध 1146 धावा केल्या. यापूर्वी डेविड वॉर्नरने पंजाब किंग्सविरुद्ध 1134 धावा केल्या होता. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर विराट कोहलीच आहे. त्याने दिल्ली विरुद्ध 1130 आणि पंजाब किंग्सविरुद्द 1104 धावा केल्यात.

विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 300हून अधिक षटकार मारले आहेत. आरसीबी किंवा इतर कोणत्याही संघासाठी टी20 मध्ये यापेक्षा जास्त षटकार कोणत्याही खेळाडूने मारलेले नाहीत. कोहलीनंतर ख्रिस गेल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आरसीबीसाठी 263 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून 262 षटकार मारले आहेत.

चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारच्या बाबतीत विराट कोहलीने ख्रिस गेललाही मागे टाकले. कोहलीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पाचवा षटकार मारला आणि चिन्नास्वामीविरुद्ध त्याचा एकूण षटकार 155 झाला. यासह एकाच मैदानात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. याच मैदानवर ख्रिस गेलने 151 षटकार मारले आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)