IPL 2025 : आरसीबी 28व्या सामन्यात उतरली हिरव्या जर्सीत, नेमकं का? चाहत्यांना लागली भलतीच चिंता

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 28व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ हिरव्या जर्सीत मैदानात उतरला आहे. नेमकं असं का आणि कशासाठी ते जाणून घ्या

| Updated on: Apr 13, 2025 | 3:28 PM
1 / 6
आयपीएलच्या 28व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात आरसीबीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या सामन्यात आरसीबी संघ हिरव्या जर्सीत उतरली आहे. पण यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

2 / 6
आरसीबी संघ 2011 पासून हिरव्या जर्सीमध्ये एक सामना खेळताना दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी हिरवी जर्सी लकी नाही, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आरसीबीने स्पेशल जर्सीमध्ये खेळताना फक्त 4 वेळा विजय मिळवला आहे.

3 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत हिरव्या जर्सीमध्ये 14 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त चार जिंकले आहेत. उर्वरित 9 सामने त्यांनी गमावले आहेत. तसेच एका सामन्यात निकाल लागला नाही.

4 / 6
मागच्या पाच पर्वात आरसीबीने तीनवेळा विशेष जर्सी घालून पराभव पत्करला आहे. मागच्या पर्वात जेव्हा आरसीबी संघ हिरव्या जर्सीमध्ये खेळला होता, तेव्हा त्यांना केकेआरकडून 1 धावेने पराभव पत्करावा लागला होता.

5 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता 15 व्यांदा हिरवी जर्सी घातली आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना जिंकून आरसीबी हिरवी जर्सीबाबत मिथक मोडून काढणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं आहे. ग्रीन जर्सीच्या माध्यमातून या फ्रँचायझीचा उद्देश पर्यावरणाला प्रोत्साहन देणे आहे. जेणेकरून लोक अधिकाधिक झाडे लावतील.

6 / 6
आरसीबी संघाने ग्रीन जर्सीत 2011 मध्ये विजय, 2012मध्ये पराभव, 2013 मध्ये पराभव, 2014 मध्ये पराभव, 2015 मध्ये निकाल लागला नाही. 2016  मध्ये विजय, 2017 मध्ये पराभव, 2018 मध्ये पराभव, 2019 मध्ये पराभव, 2020 मध्ये पराभव, 2021  मध्ये पराभव (ब्लू जर्सी), 2022 मध्ये विजय, 2023 मध्ये विजय, 2024 मध्ये पराभव झाला आहे.