
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2025 ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला. आरसीबीने या विजयासह 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली. आरसीबीने या हंगामात अनेक विक्रम केले. आरसीबीने या मोसमात बॅटिंग आणि बॉलिंगने सर्वांना प्रभावित केलं. त्यामुळे आरसीबीला ट्रॉफी जिंकता आली. (Photo Credit : PTI)

आरसीबी 18 व्या मोसमात घराबाहेरील मैदानात सर्वच्या सर्व सामने जिंकणारी एकमेव टीम ठरली. आरसीबी अशी कामगिरी करणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ ठरला. (Photo Credit : PTI)

आरसीबीने 18 व्या पर्वात एकूण 11 सामने जिंकले. आरसीबीने यासह एका मोसमात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला. आरसीबीने साखळी फेरीत 9 तर प्लेऑफमधील 2 सामने जिंकले. आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावांनी मात करत ट्रॉफी उंचावली. (Photo Credit : PTI)

आरसीबीने या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्याच घरच्या मैदानात धुव्वा उडवला. आरसीबीने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये 6 हजार 154 दिवसांनी विजय साकारला. आरसीबीने 28 मार्च रोजी चेन्नईवर 50 धावांनी मात केली. आरसीबीचा या विजयामुळे विश्वास दुणावला. (Photo Credit : PTI)

आरसीबीने चेन्नईसह यंदा मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये 3 हजार 619 दिवसांनी (जवळपास 10 वर्ष) विजय मिळवला. आरसीबीने या स्टेडियममध्ये शेवटचा सामना हा 2015 साली जिंकला होता. (Photo Credit : PTI)

यंदाच्या मोसमात आरसीबीसाठी 9 खेळाडूंनी विजयी खेळी साकारली. प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूने आरसीबीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे आरसीबीचे 9 खेळाडू हे 'मॅन ऑफ द मॅच' ठरले. आयपीएल स्पर्धेत आरसीबी सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारी दुसरी टीम ठरली. (Photo Credit : PTI)