IPL 2026: ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार नसता तर…! प्लेइंग 11 वरून पुन्हा चर्चा
आयपीएल 2026 स्पर्धेत ऋतुराज गायकवाडची बॅट शांत आहे. आतापर्यंत खेळलेल्या सातही सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही काही खास करू शकला नाही. त्यामुळे कर्णधार नसता तर काय झालं असतं? असा प्रश्न विचारला जात आहे.

Mumbai Indians vs Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना असल्याने ऋतुराज गायकवाडकडून अपेक्षा होत्या. मात्र त्याने अपेक्षाभंग केला. फक्त 22 धावा केल्या आणि बाद झाला. (Photo: IPL)

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने चांगली सुरूवात केली. चौकार आणि षटकार मारला, पण फिरकीपटू अल्लाह गजनफरने त्याला अडकवलं. गजनफरच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नावावत झेल बाद झाला. तिलक वर्माने त्याचा अप्रतिम झेल पकडला. (Photo: IPL)

आयपीएल 2026 स्पर्धेत ऋतुराज गायकवाड अद्याप तरी काही खास करू शकलेला नाही. त्याने सात सामन्यात एकही अर्धशतक ठोकलं नाही. त्याने 7 सामन्यात 14.85 च्या सरासरीने 84 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 120 पेक्षा कमी होता. (Photo: IPL)

ऋतुराज गायकवाडने आतापर्यंतच्या सामन्यात 6, 28, 7, 15, 7, 19, 22 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडला काही सामन्यात चांगली सुरुवात मिळाली मात्र त्याचं रुपांतर मोठ्या धावसंख्येत करण्यात अपयश आलं. विकेट झटपट पडल्याने संघावर दबावही वाढला. (Photo: IPL)

ऋतुराज गायकवाडची कामगिरी पाहता चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसला आहे. ऋतुराज गायकवाड कर्णधार नसता तर त्याला कधीच प्लेइंग 11 च्या बाहेर काढलं असतं. पण कर्णधार असल्याने तसं करता येत नाही. त्यामुळे सीएसकेची अडचण झाली आहे. (Photo: IPL)