RCB vs GT : विराट, साई आणि शुबमनमध्ये चढाओढ, खास कामगिरीसाठी तिघे भिडणार, कोण जिंकणार?
RCB vs GT Qualifier 1: धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वालिफायर 1 चा थरार 26 मे रोजी रंगणार आहे. या सामन्यात आरसीबी गुजरात विरुद्ध 2 हात करणार आहेत. या सामन्यात विराट कोहली, साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांच्यात वेगळाच सामना पाहायला मिळणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वालिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात आरसीबीचा विराट कोहली आणि गुजरात टायटन्सची सलामी जोडी साई सुदर्शन-कॅप्टन शुबमन गिल यांच्यात क्रिकेट चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे. (Photo Credit: PTI)

विराट, साई आणि शुबमन यांच्यात 19 व्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक चौकार लगावण्याबाबत ही चुरस आहे. तिघांकडेही जबरदस्त कामगिरी करुन सर्वाधिक चौकारांचा विक्रम आपल्या नावावर करण्याची समसमान संधी आहे. (Photo Credit: PTI)

ताज्या आकडेवारीनुसार, 19 व्या मोसमात सर्वाधिक चौकारांचा विक्रम हा साई सुदर्शन याच्या नावावर आहे. साईने 62 चौकार लगावले आहेत. तर शुबमन गिल हा तिसऱ्या स्थानी आहे. शुबमनने 57 चौकार लगावले आहेत. (Photo Credit: PTI)

तसेच सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आरसीबीचा विराट कोहली दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. विराटने 19 व्या हंगामात 59 चौकार लगावले आहेत. (Photo Credit: PTI)

साई, विराट आणि शुबमन यांच्यातील चौकारांचं अंतर फार नाहीय. त्यामुळे आता साई आणखी चौकार ठोकून आपला विक्रम कायम राखणार की शुबमन-विराट या दोघांपैकी कोणता फलंदाज रेकॉर्ड ब्रेक करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit: PTI)