अभिषेक शर्माची नको त्या यादीत एन्ट्री, रोहित-सॅमसनची बरोबरी करत या वर्षात सहाव्यांदा पाहिला असा दिवस
आयपीएल 2026 स्पर्धेत क्रीडाप्रेमींच्या नजरा या सनरायझर्स हैदराबाद संघाकडे आहेत. कारण या संघात एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. गोलंदाजांचा सळो की पळो करून सोडण्याची ताकद आहे. पण अभिषेक शर्माची स्थिती मात्र वाईट आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहावा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने 5 गडी राखून जिंकला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या आघाडीच्या फलंदाजांची सुमार कामगिरी राहिली. त्यात अभिषेक शर्माने नकोसा विक्रम रचला. (Photo: Sunrisers Hydrabad)

अभिषेक शर्मा फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण 2 चेंडूंचा सामना केला आणि खातं न खोलता तंबूत परतला. अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला आणि नकोसा विक्रम त्याने आपल्या नावावर नोंदवला. (Photo: Sunrisers Hydrabad)

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा संयुक्तपणे तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम रोहित शर्मा आणि संजू सॅमसनच्या नावावर होता. आता यात अभिषेक शर्माची भर पडली आहे. (Photo: Sunrisers Hydrabad)

अभिषेक शर्मा या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 2 वेळा शून्यावर बाद झाला. त्यानंतर टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये 3 वेळा खातं न खोलता तंबूत परतला. आता आयपीएल 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. (Photo: Sunrisers Hydrabad)

अभिषेक शर्मा टी20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये वर्ष 2026 मध्ये सहाव्यांदा बाद झाला आहे. रोहित शर्मा 2018मध्ये सहा वेळा शून्यावर, तर 2024 मध्ये संजू सॅमसन सहा वेळा शून्यावर बाद झाला होता. (Photo: Sunrisers Hydrabad)